“धनत्रयोदशी शुभेच्छा 2024 या दिवाळीत आपल्या प्रियजनांना खास मराठी संदेश पाठवा आणि समृद्धी, आरोग्य व शुभेच्छांचा आनंद साजरा करा!”
धनत्रयोदशी शुभेच्छा
- धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी,
कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरे करू
आली रे आली दिवाळी आली - जीवनात आनंद नांदो
लक्ष्मी देवीच्या कृपेने
धनत्रयोदशीला पैशाचा खजिना भरो
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा! - पहिला दिवा आज लागेल दारी,
सुखाचा किरण येईल तुमच्या घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा…
तुम्हाला धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा - उटण्याचा नाजूक सुंगध घेऊन,
आली आली दिवाळी पहाट,
पणतीतल्या दिव्यांच्या तेजाने उजळेल आयुष्याची वाट…धनत्रयोदशीच्या शुभेच्छा - फटाके, कंदील आणि पणत्यांची रोषणाई
चिवडा -चकली लाडू करंजीची लज्जत न्यारी,
नव्या नवलाईची दिवाळी येता आनंदली दुनिया सारी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! - लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली,
उटण्याचा स्पर्श सुंगधी,
फराळाची लज्जत न्यारी,
रंगावलीचा शालू भरजरी,
आली आली हो दिवाळी आली…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! - अंगण सजले फुल आणि रांगोळ्यांनी,
स्वागत करण्यास दिवाळसणाची,
तोरणे आकाश कंदिल लागले दारी…
आली आली दिवाळी आपुल्या घरी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
(धनत्रयोदशी शुभेच्छा)
- धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
धनत्रयोदशी शुभेच्छा 2024
- लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा
घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा - रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या मंगल पावलांनी तुमचे घर आनंदाने भरू दे…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! - स्नेहाचा सुंगध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! - चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणतो मी होईन वाती,
थेंबभर तेल म्हणते मी होईन साथी…
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती…
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! - दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार,
आनंदाचा होतो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने मिळो तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…
आमच्या आयुष्यात तुमचे असणे हेच आहे आमचे भाग्य….
धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा(धनत्रयोदशी शुभेच्छा 2024) - आपणा सर्वांना दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा….
ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह,
उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो - आपणांस धन,
धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी,
यश आणि किर्ती प्राप्त होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा - लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी
- दिवाळी आली चला काढा सुंदर रांगोळी,
लावा दिवे आणि फटाक्यांचा करा धूमधडाका….
आमच्याकडून तुम्हाला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा - रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,
दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने उजळू दे,
धन आणि आरोग्याची साथ लाभू दे…..
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा - दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास,
फराळाचा सुंगधी सुवास,
दिव्यांची सजली आरास,
मनाचा वाढवी उल्हास…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! - कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो,
दीपावली निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! - धनत्रयोदशीचा शुभ दिवस तुम्हाला जगातील सर्व चांगुलपणा लाभो!
तुम्हाला निरोगी, श्रीमंत आणि आनंदी आयुष्यासह वर्षाव करुन द्या
धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा - आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! - धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा - धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!(धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी) - आला आला दिवाळीचा सण…
घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण
दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी…
धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
- नवा गंध नवा ध्यास,
सर्वत्र पसरली रांगोळीची आरास,
दिपावलीच्या निमित्ताने आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा खास…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! - पणतीचा उजेड घरभर पसरू दे,
लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! - धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी
कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी
फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा - धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो
ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची
आणि भरभराटीची जावो
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा - फुलाची सुरूवात कळीपासून होते,
जीवनाची सुरूवात प्रेमापासून होते आणि
आमच्यासाठी दिवाळीची सुरूवात आमल्या माणसांपासून होते…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! - घेऊनि दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधूर उटण्याचा,
करा संकल्प सुंदर जगण्याचा.
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा….
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
(धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा) - धन्वतरीचा हा सण,
आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! - तुमच्या जीवनात अपार संपत्ती, सुख, समृद्धी आणि आनंद येवो.
तुम्हाला लक्ष्मी, गणेश आणि कुबेर देवतेचा आशीर्वाद मिळेल.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी
- जीवनात फक्त प्रकाश असावा
तुमच्या सर्व आशा पूर्ण होवोत
देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करो
सर्व बाजूंनी पैशांचा पाऊस पडो
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा! - चांदीच्या वाटीत ठेवला बदामाचा शिरा,
आपुलकीचा त्याला आहे स्वाद खरा,
तुमचा चेहरा आहे हसरा…पण दिवाळीला जास्त करू नका नखरा….
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा - लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
घेऊनि नवी उमेद नवी आशा,
हि दिवाळी तुम्हास जावो सुखाची हिच सदिच्छा…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! - धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु
अमृतमयी मंगलमय हो
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! - धनत्रयोदशीच्या निमित्ताने
आपणास व आपल्या कुटुंबास
धन आणि आरोग्य लाभो हीच सदिच्छा
शुभ दीपावली! - दिवाळी आली सोनपावली,
उधळण झाली सौख्याची,
धनधान्यांच्या भरल्या राशी
घरी नांदू दे सुख समृद्धी…
धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा - आपल्या सर्वांना सुखी-समाधानी आरोग्य लाभू दे,
हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…! - धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने,
उत्तम आरोग्य आणि डोळे दिपवणारे ऐश्वर्य तुम्हाला लाभो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा - धनत्रयोदशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
- नवी स्वप्ने नवी क्षितीजे,
घेऊनि येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो झळाळी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !(धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी)
दिवाळी पाडवा 2024 साठी खास मराठी शुभेच्छा संदेश
- दिव्यांची रोशणाई,
फराळाचा गोडवा,
असा हा धनत्रयोदशीचा सोहळा…
धनत्रयोदशीच्या मनपूर्वक शुभेच्छा - दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुलला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र, हर्षून गेले मन,
आला आला दिवाळीचा सण,
करा प्रेमाची उधळण…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा - सर्व मित्र परिवाराला,
धनत्रयोदशीच्या धनदायी,
प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा!!! - धन धान्याची व्हावी
घरीदारी रास,
राहो सदैव लक्ष्मीचा
तुमच्या घरी वास
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! - धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा - धनतेरसच्या दिव्य दिवशी
देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे
तुम्हाला आनंद आणि चांगले आरोग्य मिळावे
धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा - धनत्रयोदशीच्या मंगल दिनी,
व्हावी बरसात धनाची,
साधून औचित्य दिपावलीचे,
बंधने जुळावी मनाची…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! - माता लक्ष्मीची कृपा आपणांवर सदैव राहू दे…
यश आणि समृद्धी आपणांस कायम मिळू दे…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा - धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, - धनत्रयोदशीला सुख-समृद्धीचा संगम होवो
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा - घरी लक्ष्मीचा वास असो आप्तेष्टांची सदैव साथ असो…
ही धनत्रयोदशी आपणांस खास असो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!