NPCI on World Uses UPI : एनआयपीएलने पेरु आणि नामिबियाच्या सेंट्रल बँकांसोबत UPI सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी सहकार्य करण्याचा करार केला आहे.
npci
NPCI on World Uses UPI : भारतामध्ये UPI ने घराघरात प्रवेश केला आहे, आणि रस्त्यावरील छोट्या व्यापाऱ्यांपासून मॉलमधील मोठ्या स्टोअरपर्यंत सर्वत्र आर्थिक व्यवहारांसाठी या प्रणालीचा वापर होत आहे. भारतात यशस्वीपणे आपले स्थान निर्माण केल्यानंतर, आता UPI आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारत आहे. NPCI च्या आंतरराष्ट्रीय शाखा NIPL (NPCI International Payments Ltd) ने पेरु आणि नामिबियाच्या सेंट्रल बँकांसोबत युपीआयसारखी प्रणाली विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
पेरु आणि नामिबियात 2027 पर्यंत UPI प्रणाली लागू होण्याची शक्यता:
NIPL चे सीईओ रितेश शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांसाठी UPI च्या प्रणालीची ब्लूप्रिंट तयार करण्यात आली आहे. पेरु आणि नामिबियामध्ये 2027 पर्यंत ही डिजिटल पेमेंट प्रणाली लागू होऊ शकते. NPCI ही भारतातील रिटेल पेमेंट सिस्टमची प्रमुख संस्था असून, ऑगस्ट महिन्यात 15 अब्ज व्यवहार UPI च्या माध्यमातून नोंदवले गेले आहेत.
NIPL च्या कर्मचारी भरतीची योजना:
सुत्रांच्या माहितीनुसार, रवांडासह इतर देशांशीही UPI संदर्भात चर्चा सुरू आहे. रितेश शुक्ला यांनी NIPL इतर देशांच्या रिअल-टाइम पेमेंट सिस्टम्ससोबत करार केल्याचे सांगितले, ज्यात सिंगापूरच्या PayNow यंत्रणेचा समावेश आहे. आतापर्यंत 7 सामंजस्य करार पूर्ण झाले असून, NIPL चे सध्या 60 सदस्य आहेत. मार्च 2025 पर्यंत टीमचा विस्तार होण्याची शक्यता आहे, सध्या काही कर्मचारी सिंगापूर आणि मध्य पूर्वातील देशांमध्ये कार्यरत आहेत.
UPI च्या जागतिक विस्तारासाठी NPCI ची पावले:
युपीआयला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी NPCI ने NIPL ची स्थापना केली आहे. एका अहवालानुसार, NIPL सध्या आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील 20 देशांशी चर्चा करत आहे. पेरु आणि नामिबियाच्या सेंट्रल बँकांशी 2026 अखेरपर्यंत किंवा 2027 पर्यंत UPI प्रणाली सुरू करण्याच्या योजना आहेत.