---Advertisement---

दिवाळी पाडवा शुभेच्छा 2024 नवीन ट्रेंडिंग शुभेच्छा येथे पहा

---Advertisement---

दिवाळी पाडवा शुभेच्छा 2024 येथे नवीन आणि ट्रेंडिंग शुभेच्छा पहा आणि आपल्या प्रियजनांना पाठवा…

दिवाळी पाडवा शुभेच्छा

दिवाळी पाडवा शुभेच्छा

  • रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
    सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ,
    गरजवंताच्या घरी येवो समृद्धी,
    हीच देवाच्या चरणी प्रार्थना,
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • दीपावली असा आहे सण,
    जो येतो बऱ्याच काळानंतर वर्षातून एकदा.
    चला मस्तपैकी करू फराळ आणि खाऊ मिठाई,
    तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • आभाळी सजला मोतियांचा चुडा,
    दारी दिव्यांचा सोनेरी सडा
    गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
    आता दिवाळीसण आनंद लुटण्याचा,
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..
    बलिप्रतिपदा,
    दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा!
  • दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की,
    तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो,
    हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो.
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • हसत राहा,
    हसता हसता दिपक लावा,
    जीवनात नवे आनंद आणा,
    दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर,
    प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर,
    नका विचार करू कोणी दिलं दुःख,
    सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
  • दिपावली पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा
    सत्याचा असत्यावरील विजय नेहमीच प्रेरणादायी ठरावा – दिवाळी पाडवा शुभेच्छा
  • दीपावली आल्यावर काढा रांगोळी,
    लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका,
    तुम्हा सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
    उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
    सुखद ठरो हा छान पाडवा,
    त्यात असूदे अवीट गोडवा!
    बलिप्रतिपदा, पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा
  • दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार,
    फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार,
    पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार,
    दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास
    दिवाळी पाडव्याच्या आपल्या सहकुटुंब, सहपरिवास सोनेरी शुभेच्छा!
  • आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
    आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!
  • सुख, शांती,समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा
    या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
दिवाळी पाडवा शुभेच्छा

दिवाळी पाडवा शुभेच्छा 2024

  • आनंदाचा सण आला,
    विनंत आहे परमेश्वराला
    सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला,
    दिवाळी पाडवा शुभेच्छा!
  • दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे,
    सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • नवा गंध, नवा वास,
    नव्या रांगोळीची नवी आरास,
    स्वप्नातले रंग नवे,
    आकाशातले असंख्य दिवे…
    दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,
    फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,
    अशीच यावी दिवाळी सर्वांकडे,
    सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो!
    आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!
  • दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, होतो आनंदाचा वर्षाव
    दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने यश आणि आनंद मिळो सर्वांना
  • आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल,
    सुफळ जीवनासाठी सजावट,
    वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके,
    यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे.
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • दिवा लागेल दारी, सुखाचा किरण येईल घरी
    पूर्ण होवोत तुमच्या साऱ्या इच्छा, तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळी पाडवा शुभेच्छा 2024
दिवाळी पाडवा शुभेच्छा 2024 नवीन ट्रेंडिंग शुभेच्छा येथे पहा 2

दिवाळी पाडवा शुभेच्छा नवऱ्याला

  • आली दिवाळी उजळला देव्हारा,
    अंधारात या पणत्यांचा पहारा
    प्रेमाचा संदेश मनात रूजवा,
    आनंदी आनंद दिवसागणिक वाढवा
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • जुना कालचा काळोख,
    सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
    सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास…
    दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • अंधाराला दूर लोटू, प्रकाशाला मारू मिठी
    एक पणती आपल्यामधल्या निखळ नात्यासाठी
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • धनाचा होवो वर्षाव
    सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव
    मिळो नेहमी समृद्धी अशी
    होवो खास तुमची आमची दिवाळी
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…
  • दीप जळत राहो मन मिळत राहो,
    मनातील गैरसमज निघून जावो,
    साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,
    हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • स्नेहाचा सुगंध दरवळला
    आनंदाचा सण आला
    विनंती आमची परमेश्वराला
    सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
    दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • तुम्हाला सुख, ऐश्वर्य, उदंड आयुष्य लाभो हीच मनी इच्छा
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…
  • आज बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा.
    राहो सदा नात्यात गोडवा.
दिवाळी पाडवा शुभेच्छा नवऱ्याला

दिवाळी पाडवा शुभेच्छा बायको साठी

  • सगळा आनंद
    सगळे सौख्य
    सगळ्या स्वप्नांची पूर्तता
    सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…
  • दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी,
    उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
    आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी.
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • प्रेमाचे दीप जळो,
    प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
    प्रेमाची उमलावी फुले,
    प्रेमाच्या पाकळ्या,
    प्रेमाची बासरी,
    प्रेमाच्या सनया-चौघडे,
    आनंदाचे दीप जळो,
    दुःखाची सावलीही न पडो.
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज दिवाळी
    पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • आला पाडवा, चला सजवूया रांगोळ्याच्या आराशी,
    इच्छित लाभो मनी असे ते, सुखही नांदो पावलाशी – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • या दिवाळी पाडव्याच्या समृद्ध दिवशी तुमच्याही आयुष्यात भरभरून आनंद येवो हीच सदिच्छा
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • पणतीतल्या दिव्याच्या तेजाने लख्ख पाडवा,
    पती-पत्नीच्या नात्यातील वाढवण्यास गोडवा,
    उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध घेऊन आला पाडवा,
    दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • वर्षामागून वर्ष जाती,
    बेत मनीचे तसेच राहती,
    पण तुझी साथ कधी न सुटती,
    हीच इच्छा कायमस्वरूपी मनी
    दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • दिव्यांची आरास मनात वाढवी उल्हास,
    अशा दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी खास
दिवाळी पाडवा शुभेच्छा बायको साठी

दिवाळी पाडवा शुभेच्छा संदेश

  • दिवाळीचा पाडवा तुम्हीही करा खास.
    पाठवा आपल्या प्रियजनांना खास संदेश आणि मेसेज.
    करा यावर्षीचा पाडवा अधिक खास.
  • गरजवंताच्या घरी येवो समृद्धी,
    हीच देवा चरणी प्रार्थना,
    दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • धनाची पूजा,
    यशाचा प्रकाश,
    किर्तीचे अभ्यंगस्नान,
    मनाचे लक्ष्मीपूजन
    संबंधाचा फराळ
    आणि समृद्धीचा पाडवा
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
    दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,
    दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया,
    भिन्न विभिन्न असलो तरी सर्व मनाने एक होऊया…
    दीपावली पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा
  • पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
    सदैव गोडवा यावा
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास,
    डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद,
    पण हे करताना मित्रांनो शुभेच्छा द्यायला विसरू नका दिवाळीचा सण आहे खास.
    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
    तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी – बलिप्रतिपदा शुभेच्छा!
  • तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
    कधी न होवो निराशा…आम्हा सगळ्यांकडून दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Pandharinath Kamble Biography: वय, चरित्र, करिअर, चित्रपट

दिवाळी पाडवा शुभेच्छा संदेश

दिवाळी पाडवा आपल्या आयुष्यात प्रेम, विश्वास, आणि सुखसमाधानाची नवीन ज्योत प्रज्वलित करतो. या मंगलमय सणाच्या निमित्ताने आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपन्नता, आणि यश प्राप्त व्हावे हीच सदिच्छा! या दिवाळी पाडव्याच्या आनंदमय क्षणांचे स्वागत करूया आणि आपले जीवन नवनिर्माणाच्या प्रकाशाने उजळवूया.

Tazya Samachar Team

Tazya Samachar Team is a group of dedicated journalists and editors committed to delivering accurate, timely news in Marathi. Covering a variety of topics such as entertainment, cricket, lifestyle, technology, business, automobiles, finance, and government schemes, our team ensures that every article is relevant and reliable for our Marathi-speaking audience.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment