Xiaomi ने भारतात बजेट स्मार्टफोन Redmi A4 5G Launch केला आहे. हा स्मार्टफोन फक्त ₹8,499 मध्ये उपलब्ध असून, भारतातील पहिला Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असलेला स्मार्टफोन आहे.
Redmi A4 5G मध्ये 6.88-इंचाचा HD+ LCD Display आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 600 निट्स ब्राइटनेससह येतो. हा डिस्प्ले वापरकर्त्यांना शानदार व्हिज्युअल अनुभव देतो.
Redmi A4 5G Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह 4GB LPDDR4X RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज, तसेच 1TB पर्यंत एक्सपांडेबल स्टोरेजची सुविधा मिळते.
Redmi A4 5G 50MP Back Camera आणि 5MP Front Camera सह, तुमच्या फोटोंना अधिक स्पष्टता आणि सौंदर्य मिळवा. हा कॅमेरा फॅमिली फोटो, पोर्ट्रेट्स आणि सेल्फीसाठी परफेक्ट आहे.
Redmi A4 5G 5160mAh मोठ्या Battery येतो, जो 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. बॉक्समध्ये 33W चार्जर दिला जातो, ज्यामुळे बॅटरी वेगाने चार्ज होते.
Redmi A4 5G Android 14-आधारित Xiaomi HyperOS वर चालणाऱ्या या स्मार्टफोनला 2 वर्षे सॉफ्टवेअर अपडेट्स आणि 4 वर्षे सुरक्षा अपडेट्स मिळतात, जे तुमच्या डिव्हाइसला दीर्घकाळ सुरक्षित ठेवते.
Redmi A4 5G 4GB + 64GB वेरियंटची किंमत ₹8,499 असून, 4GB + 128GB वेरियंट ₹9,499 मध्ये उपलब्ध आहे. Starry Black आणि Sparkle Purple हे दोन आकर्षक रंग पर्याय आहेत.