---Advertisement---

Diwali Padwa 2024 Wishes In Marathi

---Advertisement---

Diwali Padwa 2024 Wishes In Marathi: “दिवाळी पाडवा 2024 साठी खास मराठी शुभेच्छा संदेश. आपल्या प्रियजनांना पाठवा आणि…

Diwali Padwa Wishes In Marathi 2024

“दिवाळी पाडवा 2024 हा सण आनंद, समृद्धी, आणि नवीन सुरुवातींचे प्रतीक आहे. या दिवशी कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात आणि नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात करतात. मराठीतून दिलेल्या शुभेच्छा आपल्या नात्यांना अधिक घट्ट करतात आणि सणाचा आनंद द्विगुणित करतात. पाडवा म्हणजे आशा, आरोग्य, आणि समृद्धीची नवी सुरुवात. या खास प्रसंगी आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत हा मंगल सण साजरा करा. मराठी संस्कृतीत पाडव्याला असलेले महत्त्व नात्यांमध्ये नवीन उर्जा आणते. दिवाळी पाडवा 2024 आनंदाने आणि प्रेमाने साजरा करा.

Diwali Padwa 2024 Wishes In Marathi

दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी,
उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
बाहेरची सफाई खूप झाली आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

अंधाराला दूर लोटू, प्रकाशाला मारू मिठी
एक पणती आपल्यामधल्या निखळ नात्यासाठी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

धनाचा होवो वर्षाव
सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव
मिळो नेहमी समृद्धी अशी
होवो खास तुमची आमची दिवाळी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…

स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दीप जळत राहो मन मिळत राहो,
मनातील गैरसमज निघून जावो,
साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,
हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर,
प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं दुःख,
सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.

सगळा आनंद
सगळे सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता
सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…

जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास…
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Padwa Wishes In Marathi 2024

Diwali Padwa 2024 Wishes In Marathi For Husband

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आज बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा.
राहो सदा नात्यात गोडवा.

दिवा लागेल दारी, सुखाचा किरण येईल घरी
पूर्ण होवोत तुमच्या साऱ्या इच्छा, तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दिव्यांची आरास मनात वाढवी उल्हास,
अशा दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी खास

थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो!
आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!

दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,
फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,
अशीच यावी दिवाळी सर्वांकडे,
सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

Diwali Padwa Wishes In Marathi 2024

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
पण तुझी साथ कधी न सुटती,
हीच इच्छा कायमस्वरूपी मनी
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!

नवा गंध, नवा वास,
नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे…
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Padwa 2024 Wishes In Marathi For Wife

आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा

सुख, शांती,समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा
या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

हसत राहा,
हसता हसता दिपक लावा,
जीवनात नवे आनंद आणा,
दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

Diwali Padwa Wishes In Marathi 2024

आनंदाचा सण आला,
विनंत आहे परमेश्वराला
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला,
दिवाळी पाडवा शुभेच्छा!

आली दिवाळी उजळला देव्हारा,
अंधारात या पणत्यांचा पहारा
प्रेमाचा संदेश मनात रूजवा,
आनंदी आनंद दिवसागणिक वाढवा
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…आम्हा सगळ्यांकडून दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल,
सुफळ जीवनासाठी सजावट,
वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके,
यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे,
सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

Diwali Padwa Wishes In Marathi 2024

Diwali Padwa 2024 Marathi Messages

दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, होतो आनंदाचा वर्षाव
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने यश आणि आनंद मिळो सर्वांना

धनाची पूजा,
यशाचा प्रकाश,
किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन
संबंधाचा फराळ
आणि समृद्धीचा पाडवा
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की,
तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो,
हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

आला पाडवा, चला सजवूया रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते, सुखही नांदो पावलाशी – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

Diwali Padwa Wishes In Marathi 2024

Diwali Padwa Wishes In Marathi 2024

दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास
दिवाळी पाडव्याच्या आपल्या सहकुटुंब, सहपरिवास सोनेरी शुभेच्छा!

दिपावली पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा
सत्याचा असत्यावरील विजय नेहमीच प्रेरणादायी ठरावा – दिवाळी पाडवा शुभेच्छा

ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..
बलिप्रतिपदा,
दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा!

गरजवंताच्या घरी येवो समृद्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

या दिवाळी पाडव्याच्या समृद्ध दिवशी तुमच्याही आयुष्यात भरभरून आनंद येवो हीच सदिच्छा
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी,
तुमचा खिसा न होवो कधी रिकामा, मग भले येवो कितीही तंगी,
मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझ्यासाठी खरा दिवाळीचा पाडवा!

दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा करा कबुल,
आनंदाच्या या वातावरणात मलाही करून घ्या सामील – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

तुम्हाला सुख, ऐश्वर्य, उदंड आयुष्य लाभो हीच मनी इच्छा
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…

तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी – बलिप्रतिपदा शुभेच्छा!

पणतीतल्या दिव्याच्या तेजाने लख्ख पाडवा,
पती-पत्नीच्या नात्यातील वाढवण्यास गोडवा,
उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध घेऊन आला पाडवा,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळी पाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

Diwali Padwa 2024 Wishes In Marathi For Love

दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास,
डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद,
पण हे करताना मित्रांनो शुभेच्छा द्यायला विसरू नका दिवाळीचा सण आहे खास.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा छान पाडवा,
त्यात असूदे अवीट गोडवा!
बलिप्रतिपदा, पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज दिवाळी
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार,
फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार,
पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार,
दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दिवाळीचा पाडवा तुम्हीही करा खास.
पाठवा आपल्या प्रियजनांना खास संदेश आणि मेसेज.
करा यावर्षीचा पाडवा अधिक खास.

आभाळी सजला मोतियांचा चुडा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आता दिवाळसण आनंद लुटण्याचा,
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा,
आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा.
सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि दिवाळीचा आनंद लुटा आणि तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दीपावली आल्यावर काढा रांगोळी,
लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका,
तुम्हा सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृद्धी,
हीच देवाच्या चरणी प्रार्थना,
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा यावा
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दीपावली असा आहे सण,
जो येतो बऱ्याच काळानंतर वर्षातून एकदा.
चला मस्तपैकी करू फराळ आणि खाऊ मिठाई,
तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दिवाळी कधी? जाणून घ्या सर्वकाही…

सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया,
भिन्न विभिन्न असलो तरी सर्व मनाने एक होऊया…
दीपावली पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा

Tazya Samachar Team

Tazya Samachar Team is a group of dedicated journalists and editors committed to delivering accurate, timely news in Marathi. Covering a variety of topics such as entertainment, cricket, lifestyle, technology, business, automobiles, finance, and government schemes, our team ensures that every article is relevant and reliable for our Marathi-speaking audience.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment