india vs Bangladesh T20i Series: टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 3 टी 20i सामन्यांच्या मालिकेला 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
टीम इंडिया मायदेशात कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळत आहे. यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची टी 20I मालिका होणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने एकूण 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.
संघात मुख्य खेळाडू कोण?
- सूर्यकुमार यादवला कर्णधारपद देण्यात आले असून, त्याच्या नेतृत्वाखाली संघात मजबूत फलंदाज आणि गोलंदाजांचा समावेश आहे.
- नवीन चेहरा म्हणून मयंक यादव याने संघात प्रवेश केला असून, त्याच्या जलदगती गोलंदाजीने IPL मध्ये चांगले प्रदर्शन केले आहे.